

मुझफ्फर हुसेन यांना ‘क्रॉप आयकॉन पुरस्कार’
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते सैय्यद मुझफ्फर हुसेन यांची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित ‘क्रॉप आयकॉन पुरस्कार २०२६’ अंतर्गत ‘ॲग्री स्टार्टअप ऑफ द ईयर (राष्ट्रीय)’ या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा सुजाण वापर, नवकल्पनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि शाश्वत शेती तत्त्वांचा प्रसार याद्वारे कृषी क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या अग्रणी व्यक्तींना दरवर्षी हा सन्मान प्रदान केला जातो. हा पुरस्कार गुरुवारी (ता. १६) नवी दिल्ली येथे आयोजित ‘मेक इंडिया ऑर्गेनिक अँड नॅचरल प्रोग्राम २०२६’ दरम्यान प्रदान करण्यात येणार असून, कार्यक्रमाचे आयोजन कृषी जागरण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मुझफ्फर हुसेन यांनी अस्मिता ऑर्गेनिक फार्मच्या माध्यमातून विदर्भात सेंद्रिय व शाश्वत शेतीचे आदर्श मॉडेल उभे केले आहे. कमी पाण्यातही टिकून राहणारी पिके, मसाल्यांच्या लागवडीवर दिलेला भर आणि पर्यावरणपूरक तंत्रांचा प्रभावी वापर हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. गाईचे शेण व गोमूत्र यांच्या आधारे सेंद्रिय खते व जैविक कीटकनाशकांची निर्मिती करून त्यांचा थेट शेतीत वापर करण्याची पद्धत या प्रकल्पात राबविण्यात येत असून, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होत आहे. हा सन्मान विदर्भातील सेंद्रिय शेती चळवळीला नवे बळ, दिशा आणि प्रेरणा देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.