

मुंबईसह रेल्वे हद्दीतील ३३ हजार धोकादायक फांद्यांची पालिका करणार छाटणी
४६ धोकादायक झाडांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पावसाळ्यात धोकादायक झाडे व फांद्या कोसळून दुर्घटना घडू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या रस्ते तसेच रेल्वे हद्दीतील धोकादायक फांद्यांच्या छाटणीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. ४६ हजार ३३६ धोकादायक झाडांची छाटणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १२ हजार ५६१ झाडांची छाटणी करण्यात आली आहे.
उर्वरित ३३ हजार ७७५ धोकादायक झाडांची छाटणी ३१ मेपर्यंत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, रस्त्यांच्या दुतर्फा व रेल्वे हद्दीत असलेली धोकादायक झाडे तसेच फांद्यांची छाटणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
गेल्या रविवारी मुंबईत ठिकठिकाणी धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. तसेच रेल्वे हद्दीत हार्बर मार्गावरील चुनाभट्टी व जीटीबी नगर रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. पावसाळ्यात वादळ वाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅकशेजारील वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटण्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होतो. तसेच रेल्वे रुळावर झाड पडले तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यापूर्वीच रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत विभागातील उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यानंतर रविवारी चुनाभट्टी व जीटीबी नगर रेल्वे हद्दीतील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. ३१ मेपर्यंत रेल्वे हद्दीतील व मुंबईच्या रस्त्यांवरील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असल्याचे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.