

दीडशे पुनर्वसन प्रकल्प
विकसकांकडून माघारी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : वर्षानुवर्षे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडवणाऱ्या विकसकांना एसआरए प्राधिकरणाने दणका दिला आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई करून १३/२अंतर्गत १५० पुनर्वसन प्रकल्प काढून घेतले आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नव्याने विकसकांची नियुक्ती करण्याची कार्यवाही लवकरच सुरू केली जाणार आहे.
मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत. अनेक विकसकांनी आठ-दहा वर्षांहून अधिक काळापासून प्रकल्प प्रलंबित ठेवल्याने रहिवासी बेघर झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारंवार नोटीस पाठवूनही संबंधित विकसकांनी प्रकल्पाला विलंब केल्याने एसआरएने १५० प्रकल्प काढून घेतल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे या प्रकल्पासाठी नवीन विकसकांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.