नवी मुंबईत २४ तासांत तीन खून

नवी मुंबईत २४ तासांत तीन खून
Published on

नवी मुंबईत २४ तासांत तीन खून

नवी मुंबई (वार्ताहर) : नवी मुंबईत अवघ्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किरकोळ वादातून झालेले दोन खून आणि एका प्रकरणात मृतदेह जाळल्याने गुन्हेगारीचे गंभीर चित्र समोर आले आहे. रबाळे एमआयडीसी, एपीएमसी आणि पनवेल तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत.

दिघा येथील इलठणपाडा परिसरात १३ एप्रिल रोजी पहाटे अडीचच्या सुमारास सोनराज सुरेश शिंदे (३०) याचा ओळखीच्या व्यक्तींनी खून केला. घराबाहेर लावलेल्या शिडीच्या किरकोळ वादातून आरोपी कुणाल चौधरी याने आपल्या चार साथीदारांना बोलावले. सर्वांनी मिळून सोनराजला मारहाण करत दगडाने डोके व पोटावर प्रहार करून त्याचा जागीच जीव घेतला. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. वाशीतील एपीएमसी मसाला मार्केट परिसरात १२ एप्रिल रोजी पहाटे राधे किशन उर्फ मोदी या मजुराचा खून करण्यात आला. आरोपी सिद्धार्थ म्हस्के याच्यासोबत झालेल्या वादातून त्याने फरशीने डोक्यात प्रहार केला. या घटनेत राधे किशनचा जागीच मृत्यू झाला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तिसऱ्या घटनेत पनवेल तालुक्यातील जंगल परिसरात एका २० ते २५ वर्षीय अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या तिन्ही घटनांच्या तपासासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. शहरात गस्त वाढवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com