परिवहन अधिकाऱ्याला बिश्नोई टोळीकडून धमकी?

परिवहन अधिकाऱ्याला बिश्नोई टोळीकडून धमकी?
Published on

परिवहन अधिकाऱ्याला बिश्‍नोई टोळीच्या नावाने धमकी

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयानंतर प्रकार

भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती केल्यानंतर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिश्‍नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगत फोनवरून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
मिरा-भाईंदरमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा परवाने देण्यात आल्याची तक्रार आमदार नरेंद्र मेहता यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संपूर्ण राज्यातील रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच रिक्षाचालकांना मराठी भाषा येते की नाही याची खात्री करून मराठी न येणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने तपास मोहीम सुरू केली असून, त्याची सुरुवात मिरा-भाईंदरमधून करण्यात आली आहे. यादरम्यान मिरा-भाईंदरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलावडे यांना सोमवारी अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी देण्यात आली. तुम्ही रिक्षाचालकांवर मराठीची सक्ती का करता, असा सवाल करीत संबंधित व्यक्तीने स्वतःला बिश्‍नोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले. या घटनेनंतर नलावडे यांनी काशीगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान, ही धमकी एखाद्या माथेफिरू व्यक्तीकडून अधिकाऱ्यांवर मानसिक दबाव टाकण्यासाठी दिली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
------
एखाद्या माथेफिरू हिंदी भाषिकाने अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक धमकी देण्याचा प्रयत्न केला असल्याची शक्यता आहे. पोलिस तपासात ते स्पष्ट होईलच; मात्र अशा धमक्यांना आम्ही बळी पडणार नाही.
- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com