

ठाणे : नौपाडा येथील गडकरी रंगायतनजवळ कुल्फी हाऊससमोर सोमवारी सकाळी ११.४५च्या सुमारास रस्त्यावर तेल सांडल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक पोलिस आणि ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर माती टाकून तेल साफ करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. साफसफाईनंतर काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.