

तारापूरमध्ये गॅस सिलिंडरला आग
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सत्तर बंगला परिसरातील करमतरा कंपनीमध्ये गॅस सिलिंडरला आग लागल्याची घटना सोमवारी सायंकाळी अंदाजे सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने तातडीने कारवाई करत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
--------
५० वर्षांनंतर ठाणे खाडीतील गाळ काढण्याचा प्रस्ताव
ठाणे : सिडको ते कळवा पूल परिसरातील खाडीत गेल्या पाच दशकांपासून साचलेला गाळ काढण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. आमदार संजय केळकर यांनी मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करत उपाययोजनांवर चर्चा केली. गाळ साचल्याने खाडीची रुंदी कमी झाली असून, भरतीच्या वेळी दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर गाळ उपसणे, संरक्षक भिंत उभारणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.