शिक्षण विभागाविरोधात शिक्षक सेना आक्रमक

शिक्षण विभागाविरोधात शिक्षक सेना आक्रमक
Published on

शिक्षण विभागाविरोधात शिक्षक सेना आक्रमक
चुकीच्या धोरणांविरोधात १६ एप्रिलला राज्यभर तीव्र आंदोलनाची घोषणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : राज्यातील शिक्षण विभागातील प्रलंबित समस्या आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने आता थेट संघर्षाची भूमिका घेत १६ एप्रिलला संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदेालन छेडले जाणार असून, यात मुंबईतील शिक्षण उपसंचालक कार्यालयाला धेराव घालत प्रशासनाचा निषेध केला जाणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.
शालेय शिक्षण आयुक्तांपासून ते सचिवांपर्यंत अनेकदा निवेदने देऊनही त्यावर कोणताच सकारात्मक निर्णय घेतला जात नसल्याने शेवटी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती शिक्षक आमदार अभ्यंकर यांनी दिली.

आता पटपडताळणी नको
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा आणि निकालाच्या धामधुमीत पटपडताळणीचा घाट घातला जात आहे. यातून शिक्षकांना नाहक त्रास देण्याचे कारस्थान विभागाकडून केले जात असल्याने पटपडताळणीचा हा कार्यक्रम सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान घेण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com