कर्ज मंजुरीस विलंबामुळे लावलेले व्‍याज रद्द हाेणार

कर्ज मंजुरीस विलंबामुळे 
लावलेले व्‍याज रद्द हाेणार
Published on

कर्ज मंजुरीस विलंबामुळे
लावलेले व्‍याज रद्द हाेणार
म्हाडाचा लोकशाहीदिन कार्यक्रमात निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : म्हाडाच्या लाॅटरीत घर लागल्यानंतर बँकेकडून कर्ज मिळण्यास अनेकदा विलंब होतो. त्यामुळे म्हाडाकडून आकारली जाणारी व्याजाची रक्कम विरार-बोळिंज येथील विजेत्यांना माफ होणार आहे. त्याबाबतचा निर्णय आज म्हाडाच्या लोकशाहीदिनात घेण्यात आला. त्यामुळे व्याज लागलेल्या विजेत्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनात आज उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीदिन पार पडला. यामध्ये नागरिकांच्या १३ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली. रामकृष्ण पाताडे हे कोकण मंडळाच्या २०२४मधील सदनिका सोडतीत विरार-बोळिंज गृहनिर्माण योजनेत यशस्वी अर्जदार ठरले. बँकेकडून कर्ज मंजुरीस विलंब झाल्याने सदनिकेची विक्री किंमत भरण्यास उशीर झाला आणि त्यामुळे मंडळातर्फे नियमानुसार त्यांच्यावर एक लाख ८३ हजार रुपये एवढे व्याज आकारणी करण्यात आली होती. हे व्याज माफ करण्याबाबत पाताडे यांनी आजच्या लोकशाहीदिनात अर्ज केला. त्यावर सुनावणी करताना संजीव जयस्वाल यांनी विशेष बाब म्हणून व मानवतेच्या दृष्टिकोनातून पाताडे यांचे व्याज माफ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, विरार-बोळिंज गृहनिर्माण योजनेतील इतर प्रकरणांतही समान न्याय म्हणून याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्याचा अनेकांना लाभ होऊ शकणार आहे. आजच्या लोकशाहीदिनात अनेक प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात आल्याने संबंधितांनी समाधान व्‍यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com