आदेशांचे पालन कसे करणार?

आदेशांचे पालन कसे करणार?
Published on

आदेशांचे पालन कसे करणार? 

फेरीवाला धोरणाबाबत न्यायालयाचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : फेरीवाल्यांसंदर्भात नवीन धोरण तयार होईपर्यंत न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न नुकताच उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला विचारला. तसेच मुंबईसाठी शहर फेरीवाला समितीच्या (टीव्हीसी) निवडणुकीचे निकाल जाहीर करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या, हे स्पष्ट करण्यासाठीही न्यायालयाने पालिकेला वेळ दिला. 

गोरेगाव व्यापारी संघटनेने केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने महापालिका आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. या याचिकेत गोरेगावमधील परवानाधारक दुकाने आणि इतर आस्थापनांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. विशेषतः बेकायदा फेरीवाल्यांकडून होणाऱ्या हिंसाचाराचा मुद्दा अधोरेखित केला होता. महापालिकेने २०१४चा पदपथ फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार समित्यांची स्थापना आणि नवीन धोरण आखणे अनिवार्य आहे, असे या प्रकरणात न्यायमित्र म्हणून नेमलेले वकील जमशेद मिस्त्री यांनी न्यायालयाला सांगितले. त्याचीही दखल घेऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार, अशी विचारणा करून पालिका आणि राज्य सरकारला २१ एप्रिलपर्यंत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

संघटनेच्या याचिकेनुसार, गोरेगाव पश्चिम येथील सार्वजनिक जागांवर बेकायदा फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागात आणि आरे मार्ग जंक्शनवर ही परिस्थिती अधिकच बिकट असून, नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासाठी पदपथच शिल्लक राहिले नसल्याचे याचिकेत म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com