

सोपाऱ्यातील जागतिक वारशाचे जतन
प्राचीन बौद्ध स्तूपाची पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती
विरार, ता. १४ (बातमीदार)ः वसई तालुक्यातील सोपाऱ्यातील बौद्ध स्तूपाचे अनेक वर्षांपासून रखडलेले काम अखेर मार्गी लागले आहे. याअंतर्गत महापालिकेकडून स्तूपाच्या घुमटाला मूळ स्वरूप देण्याबरोबर परिक्रमा मार्ग, चैत्य परिसराची दुरूस्तीमुळे जागतिक वारशाचे जतन झाले आहे.
सोपारा येथे अडीच हजार वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप आहे. या स्तूपाच्या दुरवस्थेमुळे बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समिती, माजी महापौर रुपेश जाधव यांनी पाठपुरावा सुरू केला होता. केंद्रीय पुरातत्त्व खात्याने स्तूपाच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आहे. मूळ स्तूपाच्या गोलाकार घुमटाला मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यात येत आहे. विटा, मातीच्या सहाय्याने पायथ्याला गोलाकार आकार दिला आहे. तसेच परिसरात परिक्रमा मार्ग, उपासक मंडळींच्या प्रार्थनेसाठी बैठक व्यवस्था आहे. याशिवाय संरक्षक भिंत, प्रसाधनगृह, आसन व्यवस्था केली आहे. या स्तूपाच्या संवर्धनानंतर वसईच्या पर्यटनाला विशेष महत्त्व येणार असल्याचे माहिती पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक कैलास शिंदे यांनी सांगितले.
=================================
व्यापाऱ्याचे केंद्र
शूपार्पक (आताचे सोपारा) ही पूर्वी कोकण प्रांताची राजधानी होती. या बंदरातून व्यापार चालायचा. अडीच हजार वर्षांपूर्वी चंदनाचे व्यापारी, नंतर तथागत भगवान बुद्धाच्या धम्माने प्रेरित होऊन अरहंत पद प्राप्त झालेल्या बौद्ध भिक्खूने पूर्ण स्तूप बांधला. सम्राट अशोकाने अपरांत प्रदेशात गौतम बुद्धांच्या अवशेषांवर स्तूप बांधले. त्यापैकी एक सोपाऱ्यातील बौद्ध स्तूप आहे. पुरातत्त्व विभागाने स्तूपाचे ७ फेब्रुवारी १८८२ मध्ये उत्खनन केले होते. त्या वेळी पाषाणाच्या करंडीत बुद्धाच्या आठ मूर्ती होत्या.
-------------------
स्तूपाची रचना
परीघ - ६८ फूट व्यास,
स्तूपाचा पाया - २८० फूट
घुमटाचा परीघ - २६८ फूट
उंची ४०-४५ फूट
=======================================
संवर्धनासाठी पालिकेचा पुढाकार
नालासोपारा येथील बौद्ध स्तूपावर सम्राट अशोकाच्या २,३३० व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर अजीव पाटील यांनी बौद्ध स्तूपाची पाहणी करून हा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी पालिका नेहमीच सहकार्य करेल, असे आश्वासन दिले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.