

धर्मदाय निधीतून १५ लाखांचा निधी
विरार (बातमीदार)ः वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा धर्मदाय निधीवाटप कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सोसायटीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यावेळी वसोसायटीचे चेअरमन आशय हरेश्वर राऊत यांनी धर्मदाय निधी वाटपातून मदत करते, असे सांगितले. तसेच सोसायटीच्या भागधारकांना आजारपणासाठी वैद्यकीय आर्थिक मदत करीत असते. यावेळी सोसायटीचे चेअरमन आशय राऊत, व्हा.चेअरमन समीर पाटील, सचिव हरेश्वर राऊत यांच्याहस्ते सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ फंड ट्रस्ट संस्थेला १५ लाखांचा धनादेश देण्यात आला. या सोसायटीने गरजू संस्थांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.