जीवघेणी वायुगळती

जीवघेणी वायुगळती
Published on

वायूगळतीने मृत्यूशी गाठ
तारापूरमध्ये वर्षभरात चौघांचा मृत्यू, ३७ कामगार बाधित
बोईसर, ता. १४ (वार्ताहर)ः देशातील प्रमुख औद्योगिक वसाहतींपैकी एक तारापूर औद्योगिक वसाहत सध्या वायूगळतीच्या घटनांमुळे चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरात या परिसरात आठ घटनांची नोंद असून, ३७ कामगार बाधित झाले असून, चौघांची मृत्यूशी गाठ पडली आहे.
उद्योगांमधील निष्काळजी, सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष यामुळे वायूगळतीच्या घटना घडतात. परिणामी, कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. वांरवार घडणाऱ्या प्रकारांमुळे औद्योगिक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. २०२५ ते २०२६ कालावधीत तारापूर परिसरातील कॅमलिन फाईन सायन्स, आरती ड्रग्ज, मेडली फार्मा, विनायक केमेक्स, भगेरिया इंडस्ट्रीज कंपन्यांमध्ये वायूगळतीच्या घटना घडल्या, पण काही प्रकरणांमध्येच औद्योगिक सुरक्षा आरोग्य विभागाने कारवाई केली आहे, पण सततच्या दुर्घटनांनी तारापूर क्षेत्रातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
--------------------
वायूगळतीची कारणे
उद्योगांकडून सुरक्षा नियमांची पायमल्ली
प्रशासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष
कामगारांसाठीच्या सुरक्षा साधनांचा अभाव
------------------------
वर्षभरातील घटनाक्रम
१९ मे २०२५ - कॅमलिन फाईन सायन्समध्ये डायमिथिल सल्फेट वायूगळतीत ११ कामगार बाधित.
२१ ऑगस्ट २०२५- मेडली फार्मा कंपनीत विषारी वायूगळती; सहा जखमी, चार कामगारांचा मृत्यू
८ सप्टेंबर २०२५ - आरती ड्रग्जमध्ये एचसीएल गळती; डोकेदुखी, घशात खवखव, श्वसनाचा त्रास
२६ सप्टेंबर २०२५ - डी. एच. ऑरगॅनिक्समध्ये (प्लॉट एन-८९) वायूगळती, तीन कामगार जखमी
२५ फेब्रुवारी २०२६ - विनायक केमेक्समध्ये क्लोरीन वायूगळती
२ मार्च २०२६ - भगेरिया इंडस्ट्रीजमध्ये ओलियम गळती; ४ कामगार बाधित
२२ मार्च २०२६ - आरती फार्म वायूगळती; १७ कामगार बाधित
------------------------------
तारापूरमध्ये सततच्या वायूगळतीच्या घटनांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे. कामगारांसह स्थानिक नागरिक भीतीच्या छायेत आहेत. प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
- कामिनी सुतार, ग्रामपंचायत सदस्य, बोईसर
ः------------------------
पालघर जिल्ह्यात औद्योगिक अपघात रोखण्यासाठी कारखान्यांची तपासणी, सुरक्षा लेखापरीक्षण, प्रशिक्षण, मॉक ड्रिलने जागरूकता वाढवण्यावर भर दिला आहे.
- माधव तोटेवाड, सहसंचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com