

दगडावर साकारले महामानवाचे चित्र
पालघरच्या चित्रकाराचे बाबासाहेबांना अनोखे अभिवादन
कासा, ता.१४ (बातमीदार)ः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालघर येथील चित्रकार कौशिक जाधव यांने महाडच्या चवदार तळे परिसरातील एका दगडावर बाबासाहेबांचे चित्र साकारले आहे. या अभिनव कलाकृतीतून सामाजिक संदेशासोबतच ऐतिहासिक स्मृतींना उजाळा दिला आहे.
चित्रकार कौशिक जाधव यांनी अवघ्या अर्ध्या तासात हे चित्र रेखाटले. दगडाच्या नैसर्गिक पृष्ठभागाचा वापर करून त्यांनी अत्यंत बारकाईने बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व जिवंत केले आहे. या माध्यमातून महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रहाच्या आठवणी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्या प्रयत्न केला आहे.
------------------------------
सामाजिक जाणीवांचा संगम
कौशिक जाधव विविध सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक प्रसंगी राजपुरुष, देव-देवतांची चित्रे रेखाटतात. कलेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या कलेतून सर्जनशीलता, सामाजिक जाणीवांचा सुंदर संगम दिसून येतो. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.