मोहफुल प्रक्रियेतून रोजगार वाढीस

मोहफुल प्रक्रियेतून रोजगार वाढीस
Published on

मोहफुलातून पोटापाण्याची सोय
जव्हार तालुक्यातील आदिवासींना रोजगाराचा पर्याय
जव्हार, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील जंगल संपत्तीमुळे बाराही महिने येथील वातावरण थंड असते. त्यामुळे हंगामानुसार उपलब्ध होणारी मोहफुले आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे माध्यम झाले आहे.
काही वर्षांपासून शेतीच्या उत्पादनात निसर्गाच्या लहरीपणामुळे मोठी घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी, मजुरांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशातच जव्हार तालुक्यातील जंगल परिसरातील वनसंपदा अनेकांसाठी आधारवड ठरत आहे. जंगलातील मोहाची झाडे, चारोळी, टेंभर, विडी पत्त्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. मोह, टेंभरंचा हंगाम सुरू झाल्याने रोजगार मिळाला आहे. पिंपळशेत, खरोंडा, न्याहाळे, भुरिटेक, बाळकापरा, हाडे परिसरातील मोहाची झाडे कल्पवृक्ष ठरत आहेत.
------------------------
औषधी द्रव्यांसाठी वापर
मोहफुलांवर प्रक्रिया करून विविध उपयुक्त पदार्थ तयार केले जातात. वाळवलेल्या मोहफुलांपासून गोड चव असलेला पारंपरिक दारू तयार केली जाते. याशिवाय गूळसदृश गोड पदार्थ, लाडू, शिरा तसेच पशुखाद्यही बनवले जाते. काही ठिकाणी औषधी द्रव्ये तयार करण्यासाठी फुलांचा वापर जातो. मोहाची फुले केवळ उत्पन्नाचे साधन नाहीत, तर आरोग्यासाठीह महत्त्वाची मानली जातात.
-------------------------
फुलांचा हंगाम संपल्यानंतर झाडाला चिकूच्या आकाराची फळे येतात. फळे पिकून खाली पडल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या बियांना ‘मोहोटी’ म्हटले जाते. त्यापासून काढलेल्या तेलाला बाजारात मागणी आहे.
- वनिता ठाकरे, बचत गट अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com