अनाथ मुलांची २७ पदकांची कमाई

अनाथ मुलांची २७ पदकांची कमाई
Published on

अनाथ मुलांची २७ पदकांची कमाई
अंधेरीत रंगली तायक्वांडो चॅम्पियनशिप स्‍पर्धा
जोगेश्‍वरी, ता. १४ (बातमीदार) ः अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ‘स्टेअर्स फाउंडेशन’तर्फे आयोजित तिसरी मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि रायगड जिल्हास्तरीय तायक्वांडो चॅम्पियनशिप २०२५-२६ मोठ्या उत्साहात नुकतीच पार पडली. या स्पर्धेत ३० हून अधिक शाळांमधील ४५० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवत आपली क्रीडाकौशल्ये सादर केली.
स्पर्धेचे उद्‌घाटन वर्सोवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हारून खान यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे व मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे अनाथ आश्रमातील मुलांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी.
कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर या मुलांनी एकूण २७ पदके जिंकत सर्वांचे लक्ष वेधले. यात १९ सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच कांस्यपदकांचा समावेश आहे. या यशामागे प्रशिक्षक शिवराम मकवाना यांचे मोलाचे योगदान असून, ते गेल्या अनेक वर्षांपासून या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण देत आहेत. तायक्वांडो महाराष्ट्र राज्य प्रमुख दिनेश डेरे यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
स्पर्धेच्या समारोपावेळी विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार अनंत नर, माजी आमदार भारती लव्हेकर, माजी नगरसेवक योगीराज दाभाडकर, युवासेना सहसचिव समृद्ध शिर्के तसेच डॉ. महफूज खान, संदीप गाढवे, अंजली साखरकर, संतोष साखरकर, वैभव कांबळे आणि कुप्पा स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

सलग तिसऱ्या वर्षी आयोजन
स्पर्धा संचालक दीपक वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या व्यासपीठामुळे तळागाळातील खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com