मोटारसायकलवरून महिलेला लुटणारा आरोपी नेरळ पोलिसांकडून जेरबंद

मोटारसायकलवरून महिलेला लुटणारा आरोपी नेरळ पोलिसांकडून जेरबंद
Published on

दुचाकीवरून महिलेला लुटणारा आरोपी नेरळ पोलिसांकडून जेरबंद
कर्जत, ता. १४ (बातमीदार) : नेरळ परिसरातील महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र जबरीने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला रायगड पोलिसांनी अटक करत गजाआड केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
फिर्यादी महिला हेटकर आळी येथून अंबिका नाका येथे पायी जात असताना आरोपीने दुचाकीवरून मागून येत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावून पळ काढला होता. याप्रकरणी संबंधित महिलेने नेरळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. यानंतर नेरळ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीचा मागोवा घेत आरोपी प्रवीण पाटील (वय ४१, रा. कर्जत) याला सापळा रचून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ठाणे व नागपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी राहुल वरोटे यांच्या तपास पथकाने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक सुशिल काजरोळकर (तपास अधिकारी) यांच्यासह सचिन वाघमारे, लतिका कदम, राजेभाऊ केकाण, आशु बेंद्रे आणि विनोद वांगणेकर यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com