

माणगाव शहरात भरदिवसा घरफोडी
माणगाव, ता. १४ (वार्ताहर) ः माणगाव शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवार (ता. १०) वाकडाई नगर येथील एका बंद घर चोरट्यांनी फोडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घर बंद असल्याचा फायदा घेत चोरट्याने मागील बाजूचा दरवाजा उघडून सुमरे दोन लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. दिवसाढवळ्या अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याप्रकरणी माणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार सुरज फडताडे करीत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.