

उरणकरांची तीन वर्षांची प्रतीक्षा संपणार
गव्हाणफाटा रेल्वे पुलाचे काम अंतिम टप्प्यात; एप्रिलअखेर वाहतुकीसाठी होणार खुला
उरण, ता. १४ (बातमीदार) ः उरण पूर्व विभागाला जोडणाऱ्या गव्हाणफाटा येथील रेल्वे पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. एप्रिल २०२६ अखेरपर्यंत हा पूल सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी खुला होणार असून, यामुळे उरण तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
तीन वर्षांपूर्वी हा जुना पूल पाडल्यामुळे नवी मुंबई, पनवेल आणि उरण पूर्व विभागाला जोडणारी बस व रिक्षासेवा विस्कळित झाली होती. जांभूळपाडा, वेश्वी, दिघोडे या गावांची एसटी बससेवा पूर्णपणे बंद होती. परिणामी जासई, चिरनेर, आवरे आणि पनवेलमधील केळवणे विभागातील वाहनचालक व प्रवाशांना जेएनपीए महामार्गावरून वळसा मारून प्रवास करावा लागत होता. यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. आता गव्हाणफाटा पूल अंतिम टप्प्यात आला आहे. यामुळे नागरिकांना पनवेल, मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे मार्गाकडे जाण्यासाठी सुलभ होणार असून, प्रवास सुखकर होणार आहे. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
काम युद्धपातळीवर सुरू
मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गव्हाणफाटा-चिरनेर मार्गावरील या रेल्वे उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. सध्या पुलावरील पादचारी मार्ग आणि दोन्ही बाजूंच्या संरक्षण कठड्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. आता एप्रिलअखेरपर्यंत हा पूल पूर्णपणे वाहतुकीस सज्ज होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.