आरडीसीए क्रिकेट स्पर्धेत पेण बाप्पा संघ विजेता

आरडीसीए क्रिकेट स्पर्धेत पेण बाप्पा संघ विजेता
Published on

आरडीसीए क्रिकेट स्पर्धेत पेण बाप्पा संघ विजेता
शेखर भगतची निर्णायक खेळी; अलिबाग जेट्स उपविजेते
पोयनाड, ता. १३ (बातमीदार) : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित खुल्या गटाच्या टी-२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर रंगला. समिरा हॅबिटेटेस अलिबाग जेट्स आणि पेण बाप्पा या संघांमध्ये झालेला सामना अत्यंत थरारक ठरला. शेवटच्या चेंडूवर पेण बाप्पाला विजयासाठी दोन धावांची गरज असताना शेखर भगत यांनी निर्णायक धावा काढत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
विजयानंतर मैदानावर जल्लोषाचे वातावरण होते. पेण बाप्पा संघाचे मालक राजा म्हात्रे यांचा संघ विजेता ठरला, तर सचिन राऊळ यांच्या अलिबाग जेट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वराज्य थारकुडे, उत्कृष्ट फलंदाज श्रेयस कुमार, अंतिम सामन्याचा सामनावीर जपजित सिंह तसेच उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर सागर मुळे यांचा सन्मान करण्यात आला.
बक्षीस वितरण वैकुंठ पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी निवृत्ती पाटील, अनिरुद्ध पाटील, जयंत नाईक, प्रशांत ओक, पंकज पंडित, कौस्तुभ जोशी, प्रदीप खलाटे, शंकर दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com