ठाणे रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगेतून गांजा जप्त

ठाणे रेल्वे स्थानकावर बेवारस बॅगेतून गांजा जप्त
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे रेल्वे स्थानकावर नियमित घातपातविरोधी तपासणीदरम्यान बेवारस आढळलेल्या बॅगेतून आठ किलो २४० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त अमली पदार्थाची अंदाजे किंमत एक लाख ६४ हजार ८०० रुपये असून, याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी १०.४५ ते ११.३० या वेळेत ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाकडून फलाट क्रमांक ७/८ वर घातपातविरोधी तपासणी सुरू होती. यावेळी सीएसएमटीकडील बाजूस एन. व्ही. एंटरप्रायझेस स्टॉलजवळ एका खांबाजवळ दोन संशयास्पद बॅगा आढळून आल्या. बॅगमालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करूनही कोणीही पुढे न आल्याने पोलिसांनी त्या ताब्यात घेतल्या. फलाट क्रमांक २ वरील लोहमार्ग पोलिस चौकीत या बॅग आणून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सिक तज्ज्ञ व पंचांसमक्ष तपासणी केली असता, प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेला हिरवट रंगाचा गांजासदृश पदार्थ आढळून आला. अहवालात तो गांजा असल्याची खात्री झाली. या पदार्थाचे वजन आठ किलो २४० ग्रॅम असून बाजारातील किंमत १.६४ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही बॅग कोणाची आहे याचा शोध घेण्यासाठी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अनिता कदम यांच्या तक्रारीनुसार ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com