

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १४ : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने गेल्या वर्षभरात बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध व्यापक मोहीम राबवत तब्बल एक हजार ८९६ वाहनांवर कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनमालक व चालकांकडून एकूण २५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
कल्याण, मुरबाड आणि परिसरातील अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ही कारवाई करण्यात आली. यासाठी विशेष पथके आणि भरारी पथकांकडून नियमित तपासणी मोहीम राबवली जात असून, नियमभंग करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईबरोबरच वाहन जप्तीही करण्यात आली. अवैध वाहतूक सुरू असलेल्या मार्गांवर अचानक तपासणी मोहीम हाती घेतली होती. मुख्य वर्दळीच्या रस्त्यांसह आडवळणाच्या मार्गांवरही दर आठवड्याला तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून दंड वसूल करून कागदपत्रे अपूर्ण किंवा मुदत संपलेली आढळल्यास संबंधित वाहने आरटीओच्या वाहनतळावर जमा करण्यात आले. भरधाव वाहन चालवून प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करून सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा आणि अवैध जीप, ओमनीसारख्या वाहनांमधून प्रवास टाळावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे. सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता आगामी काळात तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात आली. त्यात त्रुटी आढळल्यास संबंधित शाळा व्यवस्थापनावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.