पावसाळ्यात विद्युत खांबापासून संरक्षण

पावसाळ्यात विद्युत खांबापासून संरक्षण
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले विद्युत खांब पावसाळ्यात जीवघेणे ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने महत्त्वाची सुरक्षितता उपाययोजना हाती घेतली आहे. पावसाळ्यात खांबांमधून विद्युतप्रवाह येऊन अपघात होण्याच्या घटना लक्षात घेता, आता शहरातील विद्युत खांबांमध्ये ‘आरसीसीबी’ स्विच बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपाययोजनेमुळे एखाद्या खांबातून वीज प्रवाहित होत असल्यास संबंधित स्विच तत्काळ ट्रिप होऊन वीजपुरवठा खंडित होईल. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार असून नागरिकांच्या जीविताचे रक्षण होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पालिकेच्या विद्युत विभागाच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, पावसाळ्यात तांत्रिक बिघाडामुळे या खांबांमध्ये विद्युत प्रवाह येण्याच्या तक्रारी वाढतात. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसीसीबी यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. आरसीसीबी स्विच बसविल्यानंतर एखाद्या खांबाला करंट लागल्यास संबंधित स्विच तत्काळ ट्रिप होऊन त्या खांबाचा वीजपुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे संभाव्य जीवितहानी रोखता येणार आहे. या उपाययोजनेमुळे पावसाळ्यात नागरिकांना अधिक सुरक्षित वावरता येईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कंत्राटदारांना सूचना
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या विद्युत विभागाने सर्व प्रभाग समित्यांअंतर्गत पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना विविध सूचनाही दिल्या आहेत. यामध्ये पथदिव्यांचे खांब आणि पॅनेलचे अर्थिंग तपासणे, टर्मिनल बॉक्स बंद ठेवणे, उघड्या वायर टाळणे, तसेच धोकादायक स्थितीतील खांब तात्काळ हटवणे, उघड्या वाहिन्यांऐवजी कायमस्वरूपी जोडणी करणे यांचा समावेश आहे. तसेच सैल फिटिंग्ज दुरुस्त करणे, उघडे पॅनेल बंद ठेवणे आणि योग्य क्षमतेचे फ्यूज वायर वापरणे याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. आरसीसीबी स्विच ट्रिप झाल्यास तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दररोज पथदिवे खांबांची पाहणी करून अहवाल सादर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. जीपीएस मार्किंगसह कंट्रोल पॅनेलचे छायाचित्र देण्याची अटही घालण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com