रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी

रेल्वे प्रवासादरम्यान बॅग चोरी
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या पालघर येथील दिनेशकुमार बाफना या प्रवाशाची ट्रॉली बॅग चोरट्याने लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. ११) घडली आहे. संबंधित प्रवासी कुटुंबासह शिरपूर येथून देवदर्शन करून परत येत होता. भुसावळ स्थानकानंतर झोपेत असताना त्याने बॅग सीटखाली ठेवली होती. मात्र, ठाणे स्थानकावर सकाळी उतरतानाच बॅग गायब झाल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या बॅगेत कपडे व इतर साहित्य असा सुमारे सात हजारांचा ऐवज होता. याप्रकरणी दादर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तो गुन्हा ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com