थंडाव्यासाठी बसमध्ये झुंबड

थंडाव्यासाठी बसमध्ये झुंबड
Published on

तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कडक उन्हामुळे नागरिकांनी आरामदायी प्रवासाचा पर्याय निवडत एसी बसकडे मोठ्या प्रमाणात वळण घेतले आहे.

एप्रिलमध्ये तापमानाचा पारा चढू लागल्याने दुपारच्या वेळेत प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. अशा परिस्थितीत एनएमएमटी एसी बसमधील थंडावा, स्वच्छता आणि आरामदायी आसनव्यवस्थेमुळे प्रवासी सामान्य बसऐवजी एसी बसला अधिक पसंती देत आहेत. विशेषतः सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी परतीच्या वेळेत या बसमध्ये प्रवाशांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळत आहे. एसी बसच्या तिकीटदरात वाढ नसल्याने मध्यमवर्गीय प्रवाशांनाही ही सेवा परवडणारी ठरत असून, प्रवासीसंख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे.

परिवहनच्या ताफ्यात सध्या वातानुकूलित व्होल्वो बस, तसेच अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. पर्यावरणपूरक आणि आरामदायी सेवेमुळे नागरिकांना दुहेरी लाभ मिळत आहे. याशिवाय काही निवडक मार्गांवर महिलांसाठी विशेष एसी बससेवाही सुरू करण्यात आली आहे, ज्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लवकरच २५० नवीन बस
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता परिवहन विभागाकडून सीएनजी, इलेक्ट्रिक बस या नवीन वर्षात परिवहनच्या ताब्यात दीडशे सीएनजीवरील बस दाखल होणार आहेत. त्याचबरोबर यात आणखी भर टाकत केंद्र सरकारच्या पीएमई बससेवेअंतर्गत १०० इ-बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे परिवहनच्या ताब्यात या आर्थिक वर्षात २५० नवीन बस उपलब्ध होणार आहेत. नवीन सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. भविष्यात बससेवेचा विस्तार करून अधिक मार्गांवर एसी बस सुरू करण्याचा विचारही प्रशासनाकडून केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com