बदलापूरमध्ये मतदार यादी पुनरिक्षणाला वेग

बदलापूरमध्ये मतदार यादी पुनरिक्षणाला वेग
Published on

बदलापूर, ता. १४ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अधिक अचूक व पारदर्शक करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १३९ मुरबाड मतदारसंघातील मतदार यादीचे २००२ मधील यादीशी मॅपिंग करण्याचे महत्त्वपूर्ण काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील त्रुटी दूर होऊन ती अधिक अद्ययावत, अचूक आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाने जबाबदारीची जाणीव ठेवत या मॅपिंग प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अंजली पवार यांनी केले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) २४ एप्रिलपर्यंत घरोघरी भेट देऊन नागरिकांची माहिती संकलित करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती उपलब्ध करून देत या प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे. ही मोहीम केवळ प्रशासकीय उपक्रम नसून लोकशाही प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांमुळे आगामी निवडणुकांसाठी मतदार यादी अधिक सुस्थितीत, त्रुटीमुक्त आणि विश्वासार्ह होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आढावा बैठक
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ११ एप्रिलला नगरपालिकेत सर्व पर्यवेक्षकांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मुख्याधिकारी मारुती गायकवाड, संबंधित अधिकारी तसेच पर्यवेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मॅपिंग प्रक्रियेची गती, अचूकता आणि नागरिकांपर्यंत पोहोच याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com