

पनवेल, ता. १४ (बातमीदार) : कळंबोली सर्कल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून केवळ दोन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गुरुवारी (ता. ९) एका दुचाकीस्वाराचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता. १०) दुपारी सुमारे ४.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आणखी दोन तरुणांचा बळी गेला.
सीसीआय गोदामासमोरील सेवा रस्त्यावर कंटेनर चालकाने भरधाव वेगात वाहन चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कमलेश यादव (वय ३६) आणि शैलेश सहानी (वय २२) हे गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असता दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सर्कल विस्तारीकरणाच्या कामामुळे सुरक्षेचा अभाव असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. अनेक महामार्ग एकत्र येणाऱ्या या ठिकाणी खड्डे, वेग नियंत्रणाचा अभाव आणि जड वाहनांची वर्दळ ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. वाहतूक पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.