आंबेडकर अभ्यासिकेतून घडलेल्या पोलिसांचा सन्मान

आंबेडकर अभ्यासिकेतून घडलेल्या पोलिसांचा सन्मान
Published on

उल्हासनगर, ता. १४ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उल्हासनगर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेतून घडलेल्या यशस्वी युवकांचा विशेष सन्मान करण्यात आला. भाजपच्या नगरसेविका सुचित्रा सुधीर सिंह यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी आहे. शिक्षणाच्या बळावर समाजातील विषमता दूर करून समानता आणि सशक्तीकरण साध्य करता येते, असे सुचित्रा सिंह यांनी अधोरेखित केले. या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे. या यशस्वी युवकांनी केवळ स्वतःचे नव्हे, तर कुटुंब आणि परिसराचेही नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे. समाजात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली. या वेळी महाराष्ट्र पोलिस दलातील कॉन्स्टेबल सुमित कांबळे, रोहन काशिंदे, स्वप्नील सरदार, आयकर विभागातील कार्यालय अधीक्षक धनंजय प्रसाद यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अभ्यासिकेच्या अधीक्षक मधुरा केणी, भाजप पदाधिकारी उर्मिला गुप्ता, ब्रिजेश श्रीवास्तव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com