वाडीबंदर ठरणार ‘वंदे भारत’चा मेंटेनन्स हब

वाडीबंदर ठरणार ‘वंदे भारत’चा मेंटेनन्स हब
Published on

वाडीबंदरमध्ये ‘वंदे भारत’ची दुरुस्ती
कोचिंग डेपोच्या कामाला गती

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : देशभरात वंदे भारत गाड्यांचा विस्तार वेगाने होत असताना त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेकडून वाडीबंदर येथे उभारण्यात येत असलेल्या कोचिंग डेपोच्या कामाला गती देण्यात आली आहे. या प्रकल्पाचे सुमारे १५ टक्के काम पूर्ण झाले असून, २०२७ पर्यंत ते पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई विभागात वंदे भारत गाड्यांची तपासणी, दुरुस्ती आणि स्वच्छता अधिक कार्यक्षमतेने होणार आहे.
मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर आणि भुसावळ या विभागांत वंदे भारत गाड्यांची संख्या वाढत असल्याने विद्यमान कोचिंग डेपोवर ताण वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाने वाडीबंदरसह निवडक ठिकाणी स्वतंत्र आणि अत्याधुनिक डेपो उभारण्याचा निर्णय घेतला. वाडीबंदर येथील प्रकल्पाला २०२३-२४मध्ये मंजुरी देण्यात आली आहे. येथे अत्याधुनिक यंत्रणा, प्रगत तपासणी सुविधा आणि सक्षम स्वच्छता व्यवस्था उभारली जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे गाड्यांची तपासणी अधिक अचूक होऊन देखभाल प्रक्रियेला वेग मिळणार आहे. त्यामुळे गाड्यांची देखभाल अधिक वेगाने व दर्जेदार पद्धतीने होईल. परिणामी गाड्यांच्या वेळापत्रकावर होणारा परिणाम कमी होऊन प्रवाशांना अधिक वेळेवर आणि सुरक्षित सेवा मिळेल.
...
वाडीबंदर डेपोविषयी
मंजुरी वर्ष : २०२३-२४
एकूण प्रकल्प खर्च : ८५.४६ कोटी रुपये
सिव्हिल कामे : ३८.५० कोटी
यांत्रिक कामे : ४०.७० कोटी
विद्युत कामे : ६.२५ कोटी
२०२६-२७ निधी : ४० कोटी रुपये
...
ऐतिहासिक डेपो
वाडीबंदर येथील कोचिंग डेपोला सुमारे १५० वर्षांचा वारसा असून, येथे ३०हून अधिक मेल-एक्स्प्रेस गाड्यांची देखभाल केली जाते. या डेपोचे आधुनिकीकरण आणि विस्तारामुळे भविष्यातील वाढती गरज भागवणे शक्य होणार आहे.
...
स्वतंत्र डेपो का गरजेचा?
वंदे भारत गाड्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्यांना विशेष तपासणी आवश्यक असते. स्वतंत्र डेपोमुळे देखभाल अधिक अचूक, जलद व सुरक्षित पद्धतीने करता येते आणि गाड्यांची विश्वसनीयता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com