

खारघरमध्ये ‘रक्तदान महायज्ञ’
मुंबईत रक्ताचा तुटवडा, टाटा कॅन्सर रुग्णालयासाठी शिबिर
पनवेल, ता. १४ (वार्ताहर) : मुंबईत दरवर्षी सुट्टीच्या काळात जाणवणारा रक्ताचा तुटवडा यंदा एप्रिल महिन्यातच तीव्र झाला आहे. त्यातच विविध रुग्णालयांतील रक्ताचा साठा निम्म्यावर आल्याने रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाइकांची मोठी ओढाताण होत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्णांच्या मदतीसाठी येत्या रविवारी, १९ एप्रिलला खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये ‘रक्तदान महायज्ञ’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये साधारणतः पाच ते सहा हजार रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध असतो. सध्या हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये सर्वाधिक ८९० पिशव्यांचा साठा असला तरी रुग्णांची संख्या पाहता हा साठा अपुरा पडण्याची भीती आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ही टंचाई अधिक भीषण होण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
त्यासाठी आरोग्यसेवेतील आधारवड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संवेदना रुग्णसेवा समितीचे अध्यक्ष आणि समर्पित सामाजिक कार्यकर्ते प्रसाद अग्निहोत्री यांनी पुढाकार घेत खारघर येथे रक्तदान महायज्ञ शिबिराचे नियोजन केले आहे. यात नवी मुंबईतील अनेक संस्था, संघटना सहभागी होत आहेत. यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.