डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ५० अभियंत्यांचे रक्तदान

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ५० अभियंत्यांचे रक्तदान
Published on

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ५० अभियंत्यांचे रक्तदान
खारघर, ता. १४ (बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या वतीने टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या उपक्रमात ५० अभियंत्यांनी रक्तदान करून जयंती साजरी केली.
टाटा कॅन्सर रुग्णालयात देशभरातील विविध राज्यांमधून मोठ्या प्रमाणात कॅन्सरग्रस्त रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. अशा रुग्णांसाठी रक्ताची सतत गरज भासत असल्याने सामाजिक बांधिलकी जपत सबआॅर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरात ५० अभियंत्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. कार्यक्रमास युवाप्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा रुग्णसेवक किरण पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रक्तदान करताना जात, धर्म किंवा भाषेचा कोणताही भेदभाव नसतो, हेच बाबासाहेबांच्या विचारांचे खरे आचरण आहे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.
कार्यक्रमादरम्यान संघटनेच्या वतीने किरण पाटील यांचा पुस्तक व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वाशी विभागाचे सहसचिव कुलदीपसिंग राजपूत, संजय मुंडे, दिनेश बागूल, योगेश बिराजदार, दादासाहेब दहींगडे, सौरभ मिश्रा यांच्यासह अनेक पदाधिकारी, अभियंत्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com