

खांदा वसाहतीत संविधान कट्ट्यावर वारली चित्राची सजावट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकजुटीचा संदेश
कामोठे, ता. १४ ( बातमीदार) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खांदा वसाहत येथील संविधान कट्टा येथे वारली चित्रांच्या माध्यमातून सजावट करण्यात आली. संवैधानिक नैतिकता ही नैसर्गिक भावना नसून ती शिकवून घ्यावी लागते. या विचारावर आधारित हे चित्र लोकशाहीतील सहभाग, जागरूकता आणि एकजुटीचा संदेश देते.
संविधान कट्ट्याच्या माध्यमातून खांदा वसाहतीमध्ये विविध सामाजिक विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने लोकांच्या हातात न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये असल्याने या वारली चित्रांद्वारे या मूल्यांचे कलात्मक सादरीकरण करण्यात आले. चित्रकार उत्तम घोष यांनी चित्र साकारले आहे. लोक एकत्र येऊन संविधान समजून घेत आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुढे येत आहेत, असे दर्शन या चित्रातून घडते, अशी माहिती चित्रकार उत्तम घोष यांनी दिली.
या उपक्रमाचे आयोजक रविना कांबळे आणि प्रविण जठार यांनी सांगितले की, आम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करत आहोत. या वारली चित्राद्वारे आम्ही संविधानाच्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.