

भीम पदयात्रेद्वारे डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
अलिबाग, ता. १४ (वार्ताहर) ः सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रायगड-अलिबाग कार्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भीम पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच अलिबाग येथील मागासवर्गीय मुले व मुलींच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त करून दिले.
आमदार महेंद्र दळवी आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार आणि प्रख्यात कायदेतज्ञ असून, त्यांनी भारतीय संविधानाद्वारे स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचा भक्कम पाया रचला. संविधानास ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून, त्यामागे त्यांच्या कार्याचा मोठा वाटा असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले.
या वेळी अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, कार्यालय अधीक्षक माधुरी पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.