

भिवंडीत पाण्याच्या टाकीत पडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
भिवंडी, ता. १४ (वार्ताहर) : येथील समदनगर परिसरात क्रिकेट खेळताना चेंडू काढण्यासाठी पाण्याच्या टाकीत उतरलेल्या १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरहम खान (१३) असे मृत बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समदनगर परिसरातील काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांचा चेंडू एका इमारतीखालील पाणी साठवण्याच्या टाकीत पडला. त्या वेळी अरहम खान हा चेंडू काढण्यासाठी टाकीत उतरला; मात्र टाकीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड करून मदतीसाठी हाक दिल्यानंतर परिसरातील काही तरुण घटनास्थळी धावून आले आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत अरहमचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.