मध्य रेल्वेवर आणखी एक नवीन एसी लोकल धावण्यासाठी सज्ज; हार्बरवर १४ फेऱ्या वाढणार

मध्य रेल्वेवर आणखी एक नवीन एसी लोकल धावण्यासाठी सज्ज; हार्बरवर १४ फेऱ्या वाढणार
Published on

मध्य रेल्वेवर आणखी एक नवीन एसी लोकल
हार्बरवर १४ फेऱ्या वाढणार; चाचण्या सुरू, महिनाअखेरीस सेवेत येण्याची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : दमट वातावरण आणि कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल झाली असून, सध्या तिच्या चाचण्या सुरू आहेत. ही लोकल लवकरच सेवेत दाखल होणार असून, हार्बर मार्गावर एसी लोकलच्या १४ फेऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील एकूण एसी फेऱ्यांची संख्या २८ वर पोहोचणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेकडून २६ जानेवारीला सीएसएमटी ते पनवेल यादरम्यान एसी लोकल सुरू करण्यात आली होती, तर उन्हाळ्यात या सेवेला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वाढत्या गर्दीमुळे अतिरिक्त फेऱ्यांची मागणी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार झालेला नवा एसी रेक मुंबईत दाखल झाला आहे. सध्या त्याच्या तांत्रिक आणि सुरक्षा चाचण्या सुरू असून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही लोकल सेवेत दाखल होणार आहे. यामुळे हार्बर मार्गावर एसी फेऱ्यांमध्ये १४ ने वाढ होणार असून, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सर्व चाचण्या यशस्वी झाल्यास ही नवी एसी लोकल या महिन्याच्या अखेरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
..............
दररोज ९४ एसी लोकल
मध्य रेल्वेवर सध्या दररोज एसी लोकलच्या ९४ फेऱ्या होत आहेत. या प्रामुख्याने सीएसएमटी-कल्याण, तसेच कसारा आणि कर्जत  मार्गांवर चालतात. हार्बर मार्गावर सध्या १४ एसी फेऱ्या सुरू असून, नव्या लोकलमुळे त्यात १४ फेऱ्यांची वाढ होऊन एकूण संख्या २८ होणार आहे.
..............
एसी रेकची संख्या नऊवर
मध्य रेल्वेच्या ताफ्यात सध्या आठ एसी लोकल रेक आहेत. यापैकी सात रेकद्वारे सेवा चालवली जाते, तर एक राखीव असतो. नव्या रेकमुळे ही संख्या नऊवर पोहोचणार असून, एसी सेवांचा विस्तार आणखी वाढणार आहे.
.............
दहावा रेक चेन्नईकडून रवाना
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीतून दहावा एसी लोकल रेक मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबईत आल्यानंतर त्याच्या चाचण्या होतील आणि साधारण दोन ते अडीच महिन्यांत तो सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com