गोव्यात पकडलेल्या भोंदूबाबावर दोन गुन्हे

गोव्यात पकडलेल्या भोंदूबाबावर दोन गुन्हे
Published on

गोव्यात पकडलेल्या भोंदूबाबावर दोन गुन्हे
ठाणे, ता. १४ : काळी जादू झाल्याची भीती दाखवत अघोरी विधीच्या नावाखाली ठाण्यातील एका महिलेकडून सुमारे अडीच कोटी रुपये आणि सोन्याचे दागिने उकळणाऱ्या कर्नाटकातील भोंदूबाबा मंजुनाथ सुंदर शेट्टी उर्फ दिक्षीत बाबा (वय ३५) याच्याविरुद्ध आधीपासूनच गंभीर गुन्हे नोंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसईतील माणिकपूर पोलिस ठाण्यात त्याच्यावर बलात्कार आणि आर्थिक अपहाराचे गुन्हे, तर वर्तकनगर पोलिस ठाण्यात विनयभंग आणि फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. हे सर्व गुन्हे महिलांशी संबंधित असून, त्याचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. दरम्यान, या भोंदूबाबाला ठाणे गुन्हे शाखेने गोवा राज्यातून कासारवडवली पोलिस ठाण्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केली आहे. प्राथमिक तपासात, तो महिलांशी ओळख वाढवून त्यांचा विश्वास संपादन करत असे आणि नंतर अघोरी विधीच्या नावाखाली पैशांची मागणी करून त्यांची फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय, ठाणे-मुंबई परिसरातील आणखी काही महिलांचीही त्याने अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com