

महिलांच्या सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक पाऊल : एकनाथ शिंदे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारने उचललेले ‘नारी शक्ती वंदन अधिनियम-२०२३’ हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या कायद्याद्वारे लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून, यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील कोर्ट नाका येथे आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आंबेडकर यांच्या समानता, न्याय आणि बंधुतेच्या विचारांची आठवण करून देत शिंदे यांनी या आरक्षण निर्णयाचे स्वागत केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत या निर्णयामुळे महिलांमध्ये त्यांची ‘लाडका भाऊ’ अशी प्रतिमा अधिक दृढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.