अंधेरी पूर्वेतील गतिरोधकांची दुरवस्था

अंधेरी पूर्वेतील गतिरोधकांची दुरवस्था
Published on

अंधेरी पूर्वेतील गतिरोधकांची दुरवस्था
अपघाताचा धोका वाढला
जोगेश्वरी, ता. १५ (बातमीदार) : अंधेरी पूर्वेतील पंपहाउस, जुना नागरदास रोड आणि वासुदेव बळवंत फडके मार्ग या वर्दळीच्या रस्त्यांवरील गतिरोधकांची दुरवस्था झाल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी या मार्गांवर रंगीत पट्ट्यांच्या स्वरूपातील गतिरोधक बसवण्यात आले होते. मात्र, सध्या अनेक ठिकाणी हे गतिरोधक उखडले असून, काही ठिकाणी पट्टे पूर्णपणे गायब झाले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी खोलगट पोकळ्या निर्माण झाल्या आहेत. तर काही ठिकाणी गतिरोधकांचे उरलेले तुकडे उंच-सखल अवस्थेत राहिल्याने रस्ता असमतोल झाला आहे. परिणामी दुचाकीस्वारांना वाहन चालवताना तोल सांभाळणे कठीण जात असून, पोकळ्या चुकवत वाकड्या मार्गाने जावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेषतः वासुदेव बळवंत फडके मार्गावर उखडलेले पट्टे रस्त्याच्या कडेला टाकून दिल्याचे दिसत असून, त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. संबंधित रस्ते विभागाने तातडीने दखल घेऊन गतिरोधकांची दुरुस्ती करावी तसेच दर्जेदार व रिफ्लेक्टरयुक्त पट्टे बसवावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com