उधवा ग्रामपंचायतीचा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद

उधवा ग्रामपंचायतीचा शैक्षणिक उपक्रम कौतुकास्पद
Published on

अवकाश निरीक्षणातून आनंदाला उधाण
उधवा ग्रामपंचायतीच्या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक
कासा, ता. १५ (बातमीदार)ः उधवा ग्रामपंचायतीचे पेसा अध्यक्ष डॉ. रामचंद्र थोरात यांनी पेसा निधीचा प्रभावी वापर करत विद्यार्थ्यांना अवकाश निरीक्षण कार्यक्रम केला. या वेळी कासातील अनुजा अवकाश निरीक्षण केंद्राच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, दीर्घिका, सूर्यमाला, आकाशगंगा, राशी, नक्षत्रे, ग्रहणासंबंधीचे गैरसमज, ब्लॅक होल तसेच एलियनसारख्या विषयांची माहिती देण्यात आली.
पेसा निधीचा उपयोग केवळ पायाभूत सुविधांबरोबर शिक्षणासाठीही कसा उपयुक्त ठरू शकतो, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांमधील विज्ञानाविषयी उत्सुकतेला प्रोत्साहन देण्यात आले. याशिवाय विज्ञान व बालकथा लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या पुस्तकांचा एक संच ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक शाळेत देण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार असून, उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
---------------------------------
पेसा निधी उपयुक्त
शालेय विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे उपक्रम कमी होतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पेसा निधीतून अशा उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे मत डॉ. रामचंद्र थोरात यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com