

भरधाव कारची कंटेनरला धडक
मुंबई़-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात
मनोर, ता.१५ ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुजरात मार्गिकेवरील भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंडीतील उतारावर बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास कार चालकाचा अपघात झाला. या अपघातात बेंजामिन डिसूजाचा (वय ४७)घटनास्थळावर मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कारमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मनोर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
--------------------------
वाहतूक प्रभावित
अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.