आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोटरीचा मोलाचा उपक्रम

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी रोटरीचा मोलाचा उपक्रम
Published on

५२० विद्यार्थ्यांवर मायेचे छत्र
आंबिस्तेतील विद्यार्थ्यांसाठी रोटरीकडून सुविधा
वाडा, ता. १५ (बातमीदार)ः आंबिस्ते येथील दिगंबर पाडवी प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळेतील ५२० आदिवासी विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर आणि लीप इंडिया लिमिटेड यांच्या पुढाकारातून मदत केली आहे.
विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर साहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये १२० दोन मजली बंक बेड, ५०० बेडशीट्स, ५५० ब्लँकेट्स, ९४० ग्रंथालयासाठी पुस्तके, सहा ग्रंथालय कपाटे, विज्ञान प्रयोगशाळेसाठी आवश्यक साहित्य, दोन प्रयोगशाळा कपाटे तसेच एक भिंतीवरील पंख्याचा समावेश आहे. याशिवाय मुला-मुलींचे वसतिगृह नव्याने रंगवण्यात आले असून, विद्यार्थ्यांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित वातावरण तयार झाले आहे.
----------------------
यांचे मोलाचे सहकार्य
रोटरी क्लब्स ऑफ बॉम्बे मेट्रोपॉलिटन, रोटरी क्लब ऑफ मुंबई माहिम, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे हार्बर, रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू, रोटरी क्लब ऑफ मुंबई मुलुंड हिल्स, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच रत्ना निधी फाउंडेशन, तरणजीत सिंह, विवेक गोविलकर, स्टर्लिंग इंडस्ट्रीज यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com