प्रदूषण रोखणाऱ्या प्राणवायूची घुसमट

प्रदूषण रोखणाऱ्या प्राणवायूची घुसमट
Published on

पर्यावरण रक्षणात खो
वसई-विरार पालिकेचे वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष
वसई, ता. १५ (बातमीदार)ः जागतिक पर्यावरणदिनाला वृक्षलागवडीचे विविध उपक्रम होतात. या माध्यमातून ‘एकीकडे झाडे जगवा, झाडे वाचवा, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी’ असा नारा दिला जातो, पण दुसरीकडे पर्यावरणाच्या रक्षकांकडे दुर्लक्षामुळे वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
वसई-विरार शहर पालिकेच्या माध्यमातून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या परिसरात तसेच रस्त्याच्या कडेला वृक्षलागवड केली जाते. त्यानंतर झाडांची निगा राखणे, संवर्धन, देखरेखीसाठी जाळ्यांकरिता अर्थसंकल्पात तरतूद केली जाते. वृक्षलागवडीच्या उपक्रमातून विविध प्रजातीची झाडे लावली जातात, परंतु या रोपट्यांकडे नंतर दुर्लक्ष केले जात असल्याने मरणपंथाला गेली आहेत.
-------------------------
प्रदूषण नियंत्रणासाठी मदत
पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड मोहीम स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमातून वाढत्या प्रदूषणावर काही प्रमाणात मात करता येते. वसई-विरार शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हवेत प्रदूषणावर नियंत्रणासाठी मदत होत असते. वृक्षापासून प्राणवायूची निर्मिती होत असते. परिसरात स्वच्छंदी वातावरण होते. तसेच पक्षांचा किलबिलाट होत असतो.
---------------------
पर्यावरणप्रेमी नाराज
वृक्षलागवडीसाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी पुढे येतात. रोपांची लागवड करताना हसतमुख छायाचित्रे टिपली जातात. मात्र, त्यांच्या देखभालीकडे त्यानंतर दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून अशा उपक्रमांबद्दलच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
--------------
भरीव पैशांची तरतूद
वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत झाडांची लागवड, वृक्षसंवर्धन, नर्सरीनिर्मिती, वृक्ष गणना, पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी २०२५ - २६ आर्थिक वर्षात ६.२३ कोटी तर २०२६-२७ मध्ये ३६.०६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
-------------------------
वसईत परिसरात वृक्षांसाठीच्या संरक्षित जाळ्या तुटल्या असतील किंवा निघाल्या असतील त्या ठिकाणी पाहणी केली जाईल. तसेच संबंधित विभागाला तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील.
- स्वाती देशपांडे, उपायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com