जिल्हास्तरीय कबड्डी लीगमध्ये साई स्पोर्ट्स संघ विजेता

जिल्हास्तरीय कबड्डी लीगमध्ये साई स्पोर्ट्स संघ विजेता
Published on

साई स्पोर्टस् कबड्डीत अव्वल
तांदूळवाडी गट कला-क्रीडा प्रतिष्ठानचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश
मनोर, ता. १५ ः पालघर तालुक्यातील चहाडे येथील क्रीडा संकुल मैदानावर कबड्डी लीग स्पर्धा उत्साहाने पार पडली. या स्पर्धेत जिल्हाभरातील सात संघांमधून साई स्पोर्टस् संघ विजेता तर डहाणू तलासरी तालुका क्रीडा मंडळाच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
प्रथमच स्पर्धेला जिल्हा स्तराचे स्वरूप देण्यात आले होते. स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना संधी उपलब्ध झाली होती. अंतिम सामन्यात पंढरी पाटील यांच्या साई स्पोर्टस् सागावे संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत विजेतेपद पटकावले. साई स्पोर्टस् संघ तिसऱ्यांदा विजेते ठरला. डहाणू तलासरी तालुका क्रीडा मंडळाच्या संघाने द्वितीय क्रमांक तर जाणता राजा कबड्डी संघ तृतीय, एनव्हीव्ही वॉरियर्स डहाणू संघ चतुर्थ क्रमांकावर राहिला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून साई स्पोर्टस् संघाचा आयकॉन खेळाडू प्रतीक जाधव याची निवड करण्यात आली.
-----------------------
प्रथमच जिल्हास्तरावर स्पर्धा
तांदूळवाडी गट कला-क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच जिल्हास्तरावर ही स्पर्धा भरवण्यात आली होती.
या स्पर्धेला खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, पालघरचे नगराध्यक्ष उत्तम घरत, क्रीडा अधिकारी गिरीश इरनाक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com