

माणगावच्या विकासाला नवी गती
दोन कोटी ९१ लाखांच्या कामांना सुरुवात
माणगाव, ता. १५ (वार्ताहर) : माणगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे दोन कोटी ९१ लाख रुपयांच्या २९ विविध विकासकामांचा प्रारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमवारी (ता. १३) उत्साहात झाला. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली होती. या वेळी ॲड. राजीव साबळे, आनंदशेठ यादव, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष रिया उभारे तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
शहराचा विस्तार इंदापूर, बामणोली, निजामपूर, ढालघर आणि मोरबा या भागांकडे वेगाने होत असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधांवर ताण वाढत आहे. यासाठी रस्ते, वीज, स्ट्रीट लाइट, हायमास्ट दिवे आणि सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामुळे शहर अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
शिक्षण व रोजगारालाही प्राधान्य देत सीबीएससी शाळा, नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालयांची उभारणी सुरू आहे. दिघी पोर्ट व एमआयडीसीमुळे सुमारे १,४०० कोटींच्या प्रकल्पांतून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
चौकट
बायपास, शिवसृष्टी व रस्तेविकासाला चालना
खासदार तटकरे यांनी वाकडाई मंदिर रस्त्यासाठी ७० लाखांची तरतूद जाहीर करून उर्वरित निधी लवकर देण्याचे आश्वासन दिले. तसेच शिवसृष्टी प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच काम सुरू होणार आहे. माणगाव बायपास मार्गातील अडथळे दूर करून वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
फोटो ओळ - माणगाव नगर पंचायत हद्दीत विविध विकासकामांचा शुभारंभ खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला. त्या वेळी उपस्थित मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.