

चणेरा ग्रामस्थांच्या जेल भरो आंदोलनाला स्थगिती
३१ मेपर्यंत काम पूर्ण करणार; बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचे आश्वासन
रोहा, ता. १५ (बातमीदार) ः चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसर मार्गे रोहा या राज्य मार्गाचे काम गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असल्यामुळे संतप्त चणेरा ग्रामस्थांनी जेल भरो आंदोलन पुकारले होते. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. यानंतर ग्रामस्थांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे.
चणेरा-बिरवाडी-पांगलोळी-उसर मार्गे रोहा या राज्य मार्गाच्या प्रलंबित कामाविरोधात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी रोहा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुजय कुमार सिंहा यांनी मध्यस्थी करत सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागातील अधिकारी आणि आंदोलक यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून, ग्रामस्थांनी आंदोलनाला स्थगिती दिली आहे.
या रस्त्याच्या कामासाठी मुरूड आणि रोहा वन खात्याकडून आवश्यक परवानग्या जलद गतीने उपलब्ध होतील, यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे आश्वासन वन विभागातील अधिकारी महेंद्र दबडे यांनी दिले. तसेच, आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ३१ मेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याचे आश्वासन बांधकाम विभागातील उपअभियंता विजय बागुल यांनी दिले.
या वेळी उपनिरीक्षक सूर्यकांत जाधव, वन विभागातील अधिकारी (आरएफओ) महेंद्र दबडे, बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. आर. बागुल, प्रकाश विचारे, अब्बास मुकादम, वनपाल एल. के. हंबीर, वनपाल व्ही. जी. वाघमारे, संजय गोरीवले, मजीद भुरे, अनिल साळवकर, सुरेश मोरे, शंकर दिवकर, अशोक सानप, मुबशीर दाखवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.