सोनसाखळी चोरटे पाच महिन्यांनंतर गजाआड

सोनसाखळी चोरटे पाच महिन्यांनंतर गजाआड
Published on

सकाळ वृत्तसेवा 
डोंबिवली, ता. १५ : रामबाग परिसरात रात्रीच्या वेळी हॉटेल मालकाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पसार झालेल्या तिघा सराईत चोरट्यांना महात्मा फुले चौक पोलिसांनी पाच महिन्यांच्या तपासानंतर मुंबईतील गोवंडी परिसरातून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली सोनसाखळीही जप्त करण्यात आली आहे. 
पोलिसांच्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२५ ला रात्री साडेअकराच्या सुमारास सी. जी. राजन (वय ७४) हे रामबाग मार्ग क्रमांक चार येथील ‘सॉल्टी’ हॉटेल बंद करून घरी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील १० तोळे वजनाची, सात लाख रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावत दुचाकीवरून पळ काढला. 
या प्रकरणी २७ नोव्हेंबरला पहाटे महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. पुढे तपास मुंब्रा, ठाणेपर्यंत वाढवला.या दरम्यान, गुप्त बातमीदारांकडून आरोपी मुंबईतील गोवंडी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक बलीरामसिंग परदेशी यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने मुंबईत सापळा रचला. देवनार, गोवंडी परिसरात छापा टाकून दिलनवाज अब्दुल कय्यूम अन्सारी (वय ३२), रिजवान याकूब खान (वय २३) आणि शाहरुख सलीम शेख (वय ३०) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ५२ ग्रॅम वजनाची सहा लाख ७६ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास मडके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com