घाऊक बाजारात टोमॅटो गडगडला

घाऊक बाजारात टोमॅटो गडगडला
Published on

वाशी, ता. १५ (बातमीदार) : वाशीतील घाऊक भाजीपाला बाजारात टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या बाजारात टोमॅटोचे भाव १० ते १५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. मागणी कमी आणि आवक जास्त असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे व्यापारी सांगत आहेत. यामुळे किरकोळ बाजारात टोमॅटो २५ ते ३० रुपये किलोने ग्राहकांना मिळत आहेत.

सध्या सातारा, पुणे, नाशिकमधून घाऊक बाजारात टोमॅटो येत आहे. टॉमेटोच्या सरासरी ४० गाड्यांची आवक होत आहे. मात्र, मुंबईमधून येणारा खरेदीदार कमी झाल्याने बाजारात आलेल्या टोमॅटोला हवा तसा खरेदीदार मिळत नाही. त्यामुळे वाशीतील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटो पडून राहत आहे. दुपारनंतर मिळेल, त्या किमतीमध्ये व्यापाऱ्यांना टोमॅटो विकावा लागत आहे. मात्र, आवक चांगली असली, तरी हवा तितका उठाव नसल्याने भाव खाली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

हॉटेल, कॅन्टीन बंद झाल्याचा परिणाम
अनेक ठिकाणी हॉटेल, कॅन्टीन बंद झाल्या आहेत. त्या ठिकाणी जाणाऱ्या टोमॅटोची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोला उठाव मिळत नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे भाव घसरले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतकरी चिंताग्रस्त
घाऊक बाजारात टोमॅटो १०-१५ रुपये प्रतिकिलो झाले आहेत, तर किरकोळ बाजारातही भाव कमी झाले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव २५ ते ३० रुपये किलो आहे. पण, भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च निघणेही अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे, तर भाव कमी झाल्याने ग्राहकवर्ग सुखावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com