धोबी घाट पादचारी पूल पाडण्यास विरोध

धोबी घाट पादचारी पूल पाडण्यास विरोध
Published on

धोबी घाट पादचारी पूल पाडण्यास विरोध
तीव्र आंदोलन छेडण्याचा शिवसेनेचा (ठाकरे) इशारा
धारावी, ता. १५ (बातमीदार) : धारावीतील धोबी घाट पादचारी पूल पाडण्याची नोटीस रेल्वे व पालिका प्रशासनाने लावून पूल १३ एप्रिलपासून वापरण्यास बंदी घातली होती. शिवसेना (ठाकरे गट) धारावी विधानसभा, वॉर्ड क्रमांक १८५ यांच्या वतीने जुना पादचारी पूल तोडून कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता बंद करण्याचा रेल्वे व महापालिकेचा प्रयत्न आंदोलन करून हाणून पाडला. याच्या निषेधार्थ जोरदार जनआंदोलन करण्यात आले.
शेकडो विद्यार्थी, रुग्ण व रहिवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. त्‍यामुळे पालिका व रेल्वे प्रशासनाने जुन्या पादचारी पुलाच्या बाजूलाच नवा पादचारी पूल उभारून स्थानिकांची सोय करून मगच जुना पादचारी पूल पाडावा, अशी मागणी विभाग संघटक व माजी नगरसेवक विठ्ठल पवार यांनी केली आहे. जबरदस्तीने पादचारी पूल पाडण्याचा पालिका व रेल्वे प्रशासनाने प्रयत्‍न केल्‍यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नगरसेवक टी. एम. जगदीश यांनी दिला आहे. स्थानिकांची गैरसोय करून व कोणतेही नियोजन न करता पादचारी पाडू नये, असे नगरसेविका अर्चना शिंदे यांनी सांगितले.
या आंदोलनात उपविभाग समन्वयक सुरेश जाधव, शाखाप्रमुख मनीकंडन, महिला शाखा संघटक चंद्रा द्विवेदी, शाखा समन्वयक विजय शिरसेकर, शाखा संघटक दीपक पाटील, युवा शाखा अधिकारी साजन सर्कले, उपशाखाप्रमुख रमेश मुणीकृष्ण, विनोद श्रीराम, प्रकाश वाघ, व्यंकटेश जंजर, मनीष कुंचीकुर्वे, राममूर्ती, दयानंद पाटणकर आणि महिला उपशाखाप्रमुख अनुष्का कदम यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी, रुग्‍णांची गैरसोय
धारावी धोबी घाट येथून सायन, सायन कोळीवाडा व जी. टी. बी. नगर येथे जाण्यासाठी जवळची वाट म्हणून हा पादचारी पूल ओळखला जातो. हा पूल धोबी घाट येथून सायन येथील जैन सोसायटी येथे उतरतो. धारावीतील अनेक विद्यार्थी सायन येथील डी. एस. हायस्कूल, गुरुदत्त शाळा, पालिका शाळा व अनेक महाविद्यालयात जाण्यासाठी या पादचारी पुलाचा वापर करतात. तसेच सायन रुग्णालयाला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्‍यामुळे विद्यार्थी आणि रुग्‍णांची गैरसोय होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com