उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखान्याचा पर्दाफाश

उच्चभ्रू वस्तीतील कुंटणखान्याचा पर्दाफाश
Published on

नवी मुंबई, ता. १५ (वार्ताहर) : बेलापूर सेक्टर-१५ मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या देहविक्रय व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मंगळवारी (ता. १४) धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी थायलंडमधील चार आणि तीन भारतीय अशा सात महिलांची सुटका केली आहे. तसेच स्पा सेंटर चालवणाऱ्या संशयित महिलेला अटक केली आहे. पोलिसांनी या स्पामधून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त केले आहे. उच्चभ्रू वस्तीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सीवूड्स सेक्टर-१५ मधील त्रिशूळ गोल्डमाईन या इमारतीत असलेल्या स्पा पॅलेस नावाच्या स्पा सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश देशमुख, राजश्री शिंदे, उपनिरीक्षक सरिता गुडे व त्यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास या स्पा सेंटरमध्ये बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. स्पा चालक महिला नीतू हजारिलाल प्रजापत (वय ३३) ही महिला पीडित तरुणींना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून देहविक्रय करून घेत असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेविरोधात एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com