रोहा रेवा ज्युनियर कॉलेजचे रंगोत्सवात यश

रोहा रेवा ज्युनियर कॉलेजचे रंगोत्सवात यश
Published on

रोहा रेवा ज्युनियर कॉलेजचे रंगोत्सवात यश
१९ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
रोहा, ता. १५ (बातमीदार) : रोह्यातील अंजुमन-ए-इस्लाम जंजिरा उर्दू हायस्कूल येथे ११ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत रेवा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. रोहा एज्युकेशनल अँड वेल्फेअर असोसिएशनच्या या महाविद्यालयातील १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि सर्वच विद्यार्थ्यांनी यश मिळवत १०० टक्के निकालाची नोंद केली.
यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तसेच महाविद्यालयालाही विशेष स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शिक्षिका नेहा इम्तियाज भुरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य सुमय्या मुजावर तसेच शिक्षिका असमा वेळासकर, सबीया पेडेकर, जुवेरिया सिद्दीकी आणि सबा खान यांचे विशेष कौतुक होत आहे.

फोटो कॅप्शन : रंगोत्सव स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणारे रेवा ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थ्यांचा गौरव करताना प्राचार्य सौ. सूमय्या मुजावर, शिक्षिका नेहा भुरे व अन्य..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com